वादळवाट
वादळवाट
जिकडे तिकडे एक भयाण शांतता होती,
वादळाने तयार केलेली भीती होती.
आयुष्याने गूढघे टेकले हीच आमची सती होती,
पण एकवटले सगळे गण हीच आमची नाती होती.
सगळ ठीक होते तेव्हा आडवायला जात होती,
वादळा मुळेच पुन्हा नवीन एक गती होती.
चांगल झाल की वाईट यात कवीची मती होती,
झळ त्यालाच ज्याच्या घरी कोणी गेल्याची उदबत्ती होती.
पैश्याने भरणारी ती फक्त पोटाची खळगी होती,
खूप मोठा धडा घेऊन चालायची ती वादळवाट होती .
