STORYMIRROR

Trupti Naware

Fantasy

4  

Trupti Naware

Fantasy

वादळ

वादळ

1 min
570

झोक्यातली गती वाढावी

तसे हृदयाचे वाढते ठोके

हळुवार विसावणाऱ्या झोक्यात

हळव्या प्रितीचे वादळ होते.....


वादळाला कल्पना नसते

उद्या काय घडणार असते

विस्कटल्या पाण्याला सावरायचे

त्यालाही कळत नसते.....


तळमळत राहते नीरव शांतता

आक्रोशाचा आकांत पाहुन

वादळाचा वारा मग

शितल होतो


प्रयत्नांच्या हिरवळीत

गारव्याचा झरा बनुन

बिनतक्रार जगण्याच्या

आयुष्याला सवयी होतात



स्वतः च स्वतः ला सावरताना

वादळाच्या वाटा बंद होतात

पण..यावं कधीकधी

वादळानेही हृदयाच्या दारात

विखुरलेलं पुन्हा निट करावं

हळव्या प्रितीच्या हिरव्या विरहात.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy