वादळ (युद्ध)
वादळ (युद्ध)
आले वादळ प्रेमाचे घोंगावत माझ्या दारी
अशी नात्यांची गुंफण संगे पावसाच्या सरी||१||
होती कसोटी कठीण नाही उरला आधार
माया आटली कितीही नाही घेणार उधार||२||
शब्द पेरणी मधाळ करू मनाच्या रानात
नाते रक्ताचे जपूया इवल्याशा आयुष्यात||३||
चार शब्द हो प्रेमाचे नको संपत्तीचा गर्व
आज असे हातामध्ये उद्या रिकामेच पर्व||४||
अहंकार तोडी नाते शब्द शब्दाला लागता
मोठेपणा हो मनाचा दिसे निर्मळ वागता||५||
वादळांनी तुटलेले झाले संसार उध्वस्त
रोखा वेळीच भावना नको व्हायला ते अस्त||६||
