STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

3  

Prashant Shinde

Fantasy

"व"ची किंमत..!

"व"ची किंमत..!

1 min
9.0K


सहजच "व "टाईप झाले

आणि पान कोरे राहिले

म्हटले 'व' ने कित्येक

संबंध लीलया जोडले


समूह वर्णिला की

मागोमाग 'व 'यायचा

आणि समूहात

जाता जाता भर घालायचा


'व' ला खरच

जोडयची कला

मुळातच अवगत

झालेली असायची


जाईल तिथे ती

आपला आब राखायचा

आणि इतरांना ही

बरोबर घेऊन चालायचा


आज मला 'व 'चे

खरोखरच कौतुक वाटले

तो मावळतीला चालला होता

'व' मी निराश होऊन उभा होतो


'व ' हळूच कानात

येऊन मला म्हणाला

निराशेत मला कशाला ओढतोस

मला बरीच काम बाकी आहेत


एवढे म्हणून तो' व'

बेमालूमपणे निसटला

आणि सांजेच्या आनंदात

भर घालण्यास चिकटला


आणि मला बघ म्हणाला

आम्ही सारे सांजेचा आनंद लुटतोय

तुही ये लवकर रवी डुबतोय

"व" तुला तो बोलावतोय


माझी निराशा धुळीस मिळाली

"व"ची किंमत मला कळली

म्हणून रवीला पाहण्यास माझी

आनंदाने मान वळली.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy