उत्तरार्ध
उत्तरार्ध
धाव घेतली केव्हा, स्वप्न पाहुनी यशाचे
बेभान होऊन असा दौडलो, भान न्हाई कश्याचे
सर्वस्व जिंकूनीं मिरवेल तोरा, असा डंका नको मला
कोनी तरी बाजूला बसून विचारावं, कसं वाटतं तुला
तेव्हा वाटेल खरा तो जिंकलो, स्वप्न झाले सत्य
आशीर्वाद सोबत असतील तुमचे, जिंकणे होईल मग नित्य
नित्य नाही कायम, खंड पडेल बदल लहान
अजून कोनी तरी खऱ्या मनाने, करेल प्रयत्न महान
काळ लोटला बाकी, सरला सारा पूर्वार्ध
आस लागली सरते शेवट, उरला आता उत्तरार्ध
