STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Action Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Action Tragedy

उठ मित्रा! जागा हो!

उठ मित्रा! जागा हो!

1 min
14.2K


ते करतीलच मनमानी, भरतील आपले गल्ले,सत्ता त्यांची गुलाम आहे  

मर्जीचे मालक ते करतील हवं ते, सत्तेचा त्यांना माज आहे 

देशभक्तानो मरा तुम्ही, श्रद्धांजली वाहतो आम्ही असाच त्यांचा तोरा 

खाणारेही तेच, गाणारेही तेच, जाब त्यांना कुणी विचारावा?

विचार कर मित्रा ! कर्जात जगतो, कर्जात मरतो, इस्टेट असो, नसो 

कर्ज मात्र वारसांनाही देऊनच जातो, पोशिंदा तरीही तूच नागवला जातो 

आयुष्याचं साधं गणित तुला कास कळत नाही? 

अन मागितल्याशीय सहज कुणाला काहीच मिळत नाही 

आरे बाबा! भोकाड पसरविल्याशिवाय आईही मुलाला पाजत नाही 

मग हे तर मुर्दाड सरकार आहे, सोड तुझं चावून चोथा झालेल तत्वज्ञान 

जगणं आलं कि भोगणे आलं, बळी तो कान पिळी हाच इथला रिवाज 

उठ मित्रा ! जागा हो, क्रांतीचा धागा हो, तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action