उत्कृष्टता
उत्कृष्टता
यशाचे रहस्य असते उत्कृष्टता,
साधावी गुणवत्तेबरोबर योग्य अशी परिपूर्णता
अधिक मिळण्याची लोकांना द्यावी तुम्ही हमी,
राहू देऊ नका कामात उत्कृष्टततेची कमी
कार्यक्षेत्रातील कोणत्याही कामात, सर्वस्व ओता आपले,
शंभर टक्के द्यावे योगदान,उत्कृष्टतेमुळे तुम्ही गगन जिंकले
सवयीने पाट्या टाकण्याचे, नका करू काम,
सर्वोच्चस्थानी असते आपली, उत्कृष्टतताच चारीधाम
