STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

उसंत नव्हती याला...

उसंत नव्हती याला...

1 min
421

उसंत नव्हती याला ,

एक तरी श्वास मोकळा घ्यायला,

आज निश्वास झालेला देह ,

श्वास सोडून मोकळा झाला...

नात्यांना जपता जपता ,

प्रत्येक मनाचा विचार केला,

आज थोडा उशीर का ? झाला,

किती वेळ ,लागला बोलायला...


आयुष्यभर पोटचा गोळा,

आपला आपला म्हणुन सांभाळला,

देह रचलेल्या सरणावर टाकून,

अग्नी देऊनी मोकळा झाला ...


उरली निरव शांतता सभोवती,

धगधगत्या अग्नित देह कोळसा झाला,

ज्याची ओढ होती कधी मनाला,

आज भयस्वरूप जागा झाला...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract