STORYMIRROR

किरण दिगंबर बैरागी

Action Inspirational

3  

किरण दिगंबर बैरागी

Action Inspirational

उणे एके उणे

उणे एके उणे

1 min
234

लाख हुशारी असू दे अंगात...

उणीवावर बोट ठेवल्याशिवाय राहात नाहीत....

जगा वेगळे केले तरी

कमतरतेची शेपूट काही सोडत नाहीत.....

पाठ थोपटणे सोडाचं राव..!

जागा दाखविल्या शिवाय थांबतच नाहीत....!

यशस्वितेचे शिरोबिंदू हिमालयासारखे..!

त्याला ठेंगणे केल्याशिवाय राहतच नाहीत....!

कवेत घेतो आकाश सारे..!

पण मापनाची वजाबाकी काही सोडतच नाहीत...!

खेळून सामने जिंकले किती तरी..?

रडीचा डाव गायिल्याविना राहतच नाहीत...!

पुरून उरलो सगळीकडे..!

तरी न्युन दाखवल्या शिवाय थांबतच नाहीत...!

झेंडा लावला अटके पार..!

तरी तू थोडाकमी हे सांगायला विसरतच नाहीत...!

बहिरे होऊन बसले तरी

डासासारखे कानात बुंग केल्याशिवाय राहत नाहीत...!

पुळ्च्याट भीतीला कशास घाबरावे..?

दणक्याशिवाय मंडळी स्वस्थ बसणारच नाहीत....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action