STORYMIRROR

किरण दिगंबर बैरागी

Others

4  

किरण दिगंबर बैरागी

Others

अक्षय वर दे...!

अक्षय वर दे...!

1 min
131

धन संपत्ती नको माते

आरोग्य,मनःशांती दे...

बुरसाटलेल्या विचारांना

सुसंस्कृतपणाची धार दे...

स्त्रीभ्रूण हत्या रांगड्यांना

वांझुटेपणाचे भान दे...

व्याभिचारांच्या पाईकांना

मायबहिण सर्वत्र दिसू दे...

लुटेरू, भांमट्या, टपोऱ्यांना

आपुलकीचा प्रकाश दे...

भुरट्या समाजकंटकांना

अपयशाचा गुलकंद चाखू दे...

कष्टकऱ्या हरएक जीवाला

सर्वसुखाचा अक्षय वर दे...


Rate this content
Log in