ठिसूळ नाती
ठिसूळ नाती


कशास हवी ठिसूळ नाती |धृ|
मेल्याचे दुःख नाही
जन्माचा आनंद नाही..!
प्रेम जिव्हाळ्याचा लवलेश नाही
शिरी फक्त ओझे होई..!
कशास हवी ठिसूळ नाती |धृ|
प्रेमासाठी बनती नाती
सुख दुखाचे साथी नाती
घसरणारे तोल सावरती
निखळ बंधांची आत्मानुभती
कशास हवी ठिसूळ नाती |धृ|
बोल कडवे निष्ठूर आत्मभेदी
अहंकाराची कडक खादी..!
<
strong>रक्तपिपासू रावणवृत्ती
विषवल्ली काटेरी गादी...!
कशास हवी ठिसूळ नाती |धृ|
नको बुजबुज नात्यांची
गरज कुरवळणाऱ्या हातांची
जरी झाली खट्खट्
तरी ओढ लागावी सावरण्याची
कशास हवी ठिसूळ नाती |धृ|
उगाच कुरकुर दुभंगणारी
सांधून बघावी रुंद दरी..!
नाते घेतील गगन भरारी
वाहू देत आनंद लहरी...!
नसता कशास हवी ठिसूळ नाती..?