स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
लिहिणाराने लिहित जावे
वाचणारांनी वाचत जावे....
पटले तर लाईक करावे
नाही पटले तर
मौनावे....
जे मनी येईल ते उतरावे
नियम अटीना ठुकरावे....
लाईक किती ते सोडावे
आत्मसमाधान तेवढे घ्यावे....
प्रेरणादायी थापाना अंगीकारावे
पायवढू थापनवर पाणी सोडावे....
त्याचेच नाव स्वातंत्र्य जाणावे
उगीच मनाला का छळवावे....