STORYMIRROR

Samadhan Navale

Inspirational Others

3  

Samadhan Navale

Inspirational Others

उन्हाळा आणि आंबा

उन्हाळा आणि आंबा

1 min
260

झाले चोहीकडे उजाड रानं, आला बघा उन्हाळा

फळांचा राजा आंबा, साजरा करतोय सोहळा 

हवेत डोलून बघा कसा हो..

अंगी घेऊन 'भार' फळांचा हो,

उन्हातही हा हिरवा गार

देतो फळांना तरीही आधार,

द्यावे इतरांना सुख,स्वत:मात्र झेलावे दु:ख

हेच शिकवत हा आम्रवृक्ष,उभा कसा डौलाने

आम्रफळाची गोडी बघता..

न होय अमृताशीही समता,

नाही काही स्वत:साठी,झिजतो आम्र दुसऱ्यांसाठी

जिवनाच्या या रेशीमगाठी,

तुमच्यासाठी, आमच्यासाठी,

विशालदेही हे आम्रवृक्षा...

मागणी तुला हीच एक रे !

उदार गुण हे तुझ्यासारखे..

येऊ दे अंगी माझ्या रे..

झुकला आंबा फळांच्या या ओझ्यांनी

आवडीने याचा स्विकार केला

रंक आणि राजांनी,

तुला न कुणीही लहान-मोठे

लहानथोरा तु प्रिय वाटे,

तुझ्या सावलीत मिळो विसावे

हिच विनंती तुझ्या छायेसाठी

भेदभावा मनी स्थान नसावे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational