उन्हाची लावणी
उन्हाची लावणी
अहो , धनी उन बी तापलं
पाणी बी आटलं ....अन्
मधेच फुटला पाईप नळाचा
आ रं रं रं ...
भलताचं उन्हाळा छळाचा...!
अगं बाई भलताचं उन्हाळा छळाचा...
लाईट गेली घामही फुटला
गोऱ्या गाली फोडही उठला घामाचा...
घामाचा गं बाई घामाचा ।।
पाणीही नाही हवाही नाही
गोऱ्या ज्वानीला हा
गाव काय कामाचा
हो गाव काय कामाचा
गं बाई हा गाव कामाचा
इथला उन्हाळा छळाचा
हो इथला उन्हाळा छळाचा...
गं बाई इथला उन्हाळा छळाचा
अहो धनी उनबी तापलं
पाणी बी आटलं अन्
मधेच् फुटला पाईप नळाचा
भलताचं उन्हाळा छळाचा ।।
अहो ... गोरी काया ही जाई घामेजून
फुल ज्वानीचं जाइल कोमेजून
इथला उन्हाळा किती सोसायचा अजून
हवा घालणा अधून मधून
अहो , धनी उन बी तापलं
पाणी बी आटलं अन् ...
मधेच फुटला पाईप नळाचा
आ रं रं ss भलताचं उन्हाळा छळाचा ...
गं बाई इथला उन्हाळा छळाचा...
चला धनी खंडाळ्याला जावु
गार गार हवा खाऊ
कळीही प्रेमाची खुलवू
गं गं गं बाई इथला उन्हाळा छळाचा
अहो धनी उन बी तापलं
पाणी बी आटलं अन्
मधेच फुटला पाईप नळाचा
आ रं रं रं भलताच उन्हाळा छळाचा गं बाई
इथला उन्हाळा छळाचा...।
