STORYMIRROR

Pratibha Bilgi

Inspirational

3  

Pratibha Bilgi

Inspirational

उलाढाली

उलाढाली

1 min
197

जीवनातील उलढालींना आहे एक वेगळेच महत्व

सगळे झटताहेत टिकवूनी ठेवण्या स्वतःच अस्तित्व


जेव्हा कळतं त्यांना आहे हे एक सुंदर मृगजळ

तोवर व्यर्थ गेलेली असते जी केली आजवर धावपळ


स्वर्ग मिळवण्या धडपडतो बनवूनी स्वतःच जीवन क्लिष्ट

नंतर कळून चुकत त्याला मानवताच होती श्रेष्ठ


असाध्य गोष्टी साध्य करण्या धावतो अविचल निरंतर

मिळवताना हे कळतच नाही कधी वाढत जाते एकमेकांतील अंतर


आपसूकच येतो दुरावा नातीही होतात जड

मनुष्य , मनुष्य राहत नाही , दानवतेची बसते घट्ट पकड


संपेल का कधी मानवा - मानवातील जीवघेणी ही ओढाताण

आहे एकच मागणी माझी नको अशी शर्यत अन् नको असे संधान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational