उगवावी नवी पहाट...
उगवावी नवी पहाट...
वाईट जेव्हा असते वेळ माणसाची, नसते मुळीच त्याला साथ तेव्हा कोणाची... सुख दुःखात एकमेकांस द्यायचा असतो हात विसरु नये कधीच कोणी केलेली मदत... वेळ आल्यावर माणूसच येतो जवळ,जातो दूर रंग बदलतो सरड्यां सारखं वेळ सरल्यांवर... कळेनात कधीच कोणाचे सरड्यांसारखे रंग , कोणामुळे कोणाचे कधी होऊ नये स्वप्न भंग... कधीच कोणी कोणाचा करु नये विश्वास घात, जीवाला जीव देणारा खरा मित्र हवा जिवनात... कोणामुळे कोणाची लागू नये कधीच वाट, दुःख व्हावेत दूर उगवावी सुखाची नवी पहाट..
