STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy

3  

Vijay Sanap

Tragedy

उघडा संसार

उघडा संसार

1 min
1.9K


असे उघडा पाघडा

गरीबाचा हा संसार

विखूरल्या सामानाला

मिळे बाजाचा आधार ।।


ओसाडल्या जंगलात

तीन दगडाची चूल

थंडी वाऱ्यात गारठे

तिचं तान्हुलं हे मूल ।।


गायी वासरं मेंढरं

धनी नेई रानामधी

अवखळ सुटे वारा

भिती वाटे मनामधी ।।


रानी मांडता बिऱ्हाड

माळ रान वाटे वस्ती

जिथे पडतो अंधार

तिथे लावी दिवा बत्ती ।।


नाही कोठे गाव शिव

नसे कुठला निवारा

पाठी विंचाच बिऱ्हाड

घेई रानाचा सहारा ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy