उबदार शेकोटी"
उबदार शेकोटी"
माघ महिना दाटे धूक्यात
रूजलाय माझ्या काळजात
दिलबरा तुमची मज लागली लगन
होवू दोघे कातरवेळी प्रीतीत मगन....
मस्त ही गुलाबी थंडी
भरली मनी इश्काची मंडी
पेटवा शेकोटी ताप
जगी आपली प्रीतीची छाप
आल्हादक असे हे खऱ्या प्रेमाचे मीलन...
होवू दोघे कातरवेळी प्रीतीत मगन....
मन आतुरले आज
या दिलाचे तुम्ही सरताज
वाफ उबदार साची
ही लहर माघ महिन्याची
संध्या थंडीचा कापरा मनात भरुन
होवू दोघे कातरवेळी प्रितीत मगन....

