Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Inspirational

4.0  

kishor zote

Inspirational

त्यागमूर्ती (अभंग रचना)

त्यागमूर्ती (अभंग रचना)

1 min
472


सात फेब्रुवारी । जन्मदिन तिचा ।

माता रमाईचा । वंदनिय ॥ १ ॥


बालपणी छत्र । आई बाप गेले ।

काका मामा नेले | सांभाळाया ॥ २ ॥


भीमरावांशी हो । विवाह तो झाला ।

पाऊस ही आला । अशिर्वादे ॥ ३ ॥


कार्यकर्ते पाही । मदत ती देण्या ।

नाकारी ती घेण्या । स्वाभिमानी ॥ ४ ॥

 

बॅरिस्टर पती । थापे गोवऱ्याही ।

नजरेस नाही । कोणाच्याही ॥ ५ ॥


कारुण्य उदंड । मानवता साधी ।

माया नाही कधी । आटलेली ॥ ६ ॥


वस्तीगृहात त्या । कण ना धान्याचे ।

कंगन सोन्याचे । देवू केले ॥ ७ ॥


चार मुले गेली । अश्रू ते पुसले ।

म्हणून दिसले । बाबा उभे ॥ ८ ॥


बचत स्वतःची । दिला आना आना।

बाबा साहेबांना । शिकण्यास ॥ ९ ॥


माता समाजाची । झाली ती रमाई ।

खरी ही कमाई । त्यागमूर्ती ॥ १० ॥


Rate this content
Log in