STORYMIRROR

Kanchan Kamble

Romance

2  

Kanchan Kamble

Romance

त्याचीच होऊन जाते!

त्याचीच होऊन जाते!

1 min
2.4K


त्याच ते बोलण 

कानाला ऐकू आलं नाही

मनाला सार समजलयं....

बेसावध असेच काही

क्षण चोरपावलांनी आले

मन होत ह्रूदयात

तेच त्याने चोरुन नेले......

त्याच्या प्रवाहात वाहायच होतचं

बोभाटा कशाला करु?

त्याची माझी इज्जत रस्तयावर 

 बाजार कशाला मांडू

असच तो समजावत असायचा.

कधी हसवत तर कधी

 रडवत असायचा.

आज माहीत नाही काय झालय त्याला .

गुमसून कोप-यात बसून आहे

नाही बोलत नाही हसतं

एकटक मला बघत आहे.

त्याच अस बघण कधीकधी मनात सलते आहे.

अन् कधीकधी त्याची दाढी बघूनही

ईचार मनात भलतेसलते येते आहेे.

तो उगाच ञागा करतो.वस्तू आपटतो..

चाल त्याची तुफानी होते. मला माहीत असत सगळ

तो जीवाचा इतका आटा पिटा का करतो...

पण!

त्याला असच जर मिठीत घेतलय तर

माझी स्वप्न कोण पुर्ण करणार..

म्हणून त्याला तरसू देते

हळूच राञ होताच मग

या मस्त धुंद मिठीत घेते...

किती कसलं हे.. प्रेमाचही राजकारन

मन कधीकधी विचार करते

का अशी त्रुश्ना मनात मगरमिठी मारते

विचार येते.मग त्याचे ते गाणे

"उरामधी सलनारी जिवघेनी कळ दे

पण!डोळ्यामलं खार पाणी पिण्याचही बळ दे"

आठवल की जीवन खर आहे..

 प्रेम ही खर आहे असे वाटते.

मी माञ न सांगता मनातून

फक्त च्याचीच होऊन जाते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance