STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Tragedy Others

3  

Ganesh G Shivlad

Tragedy Others

त्या जुन्या वाटा..

त्या जुन्या वाटा..

1 min
220

आठवणी त्या जुन्या साऱ्या पुन्हा जाग्या झाल्या..!


त्याच जुन्या वाटा आज सर्व शांत शांत झाल्या..!


तीच शाळेची वाट आज खुप सूनसान झाली..!


चिटपाखरही त्या वाटेवर पाठ फिरवती झाली..!


मंदिराकडे जाणारी वाट तशीच नाराज आहे ..!


देव देवळात बंद तर भक्त घरात कोंडून आहे ..!


बाजाराची वाट गजबजलेली आज शांत आहे ..!


थाटमाट जाऊन शहराचा ते सारे भकास आहे..!


गावाकडे जाणारी पाऊलवाट भली मोठी झाली..!


झाडांची गर्दी हटून तेथे इमारतीची जंगले झाली..!


नाही माणूस चालायला जरी वाटा मोठ्या झाल्या..!


माणसाविना त्या जुन्या वाटा आज लहान झाल्या..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy