STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy Others

तूच हो रणरागिणी

तूच हो रणरागिणी

1 min
449

बाजारात वासनांधांच्या

स्री राहते ती बावरलेली!

कामांधाच्या नजरांना ती

रोखित राही सावरलेली!!१


तावडीत लांडग्यांच्या

शेळीच ती भेदरलेली!

श्वापदांनी जणू हिंस्र त्या

हरीणी ती असे घेरलेली!!२


हेच स्त्रीत्व आज नारीचे 

तिच्यासाठी ठरलंय शाप!

बलात्का-यांनी खूनांनी त्या

पापांचे पूर्ण भरलंय माप!!३


तिचं जिणं नराधमांनी या

तिला नकोनकोसं केलंय!

षंढांच्या अतृप्त वासनेत

तिचं आईपण लया गेलंय!!४


स्री म्हणून ती स्वत:लाच

समजू लागेल जेव्हा शापित!

जन्म देण्यापूर्वीच करेन नाश

रणचंडी होत जाईन कापित!!५


भाळावरचा कलंक हा दिलेला

पुसण्याचा तुलाच गं अधिकार!

जागृत होऊन रणरागिणींनो

करुयात नरपशूंची त्या शिकार!!६


स्व आत्मसम्मान रक्षणार्थ

एकजूटीने लढायला शिका!

लटकवा खुशाल फासावर 

नका करु निव्वळ ती टिका !!७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy