STORYMIRROR

Padmakar Bhave

Romance

3  

Padmakar Bhave

Romance

तू

तू

1 min
163

तुला काय देऊ?


तुला काय द्यावे

तोकड्या ओंजळींनी

तू पेरीत जाते

आभाळ करांनी


तू स्वामीनी गं

साऱ्या ऋतूंची

फुल पाकळी माझी

कथा काय त्याची?


तुझा स्पर्श होता

अशी जादू होते

माझी उदासी

कुठे भुर्रर्र होते


तू जाणे मनीचे

हितगुज सारे...

तुझे दुःख असते

सदा तुज प्यारे


मी ऐसा फकीर

ही शब्द झोळी

तुला अर्पितो गं

ही शब्द मोळी...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance