तू पाऊस बनून ये सख्या...
तू पाऊस बनून ये सख्या...
तू पाऊस बनून ये सख्या
तुझ्या प्रेमसरीतं मला चिंब भिजवण्यासाठी.
तू पाऊस बनून ये सख्या
मला तुझ्या आठवणींची पुन्हा आठवण करून देण्यासाठी.
तू पाऊस बनून ये सख्या
तुझ्यासोबत पावसामध्ये भिजण्याचा हट्ट धरण्यासाठी.
तू पाऊस बनून ये सख्या
माझ्या गाली निखळ हास्य फुलवण्यासाठी...

