तू नसताना
तू नसताना
तू नसतानाही मी तुझ्याशी बोलते रे
शब्दांच्या गाभारी मी तुला पाहते रे ।।
शब्दांच्या गर्दीत मज अशक्य लिहिणे रे
तू नसताना उत्कट भावना जपणे रे ।।
आठवणीत तुझ्या रात्रीस जागणे हे
तू नसताना सर्वत्र तुलाच शोधणे रे ।।
तुजवीण आता माझे जीवनच नसे रे
हृदय असूनही त्यात धडधड नसणे रे ।।
तू नसताना ही तुला शब्दात शोधते रे
मनाच्या कोपऱ्यात तुला पाहते रे ।।

