STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

.तू मानिनी, स्वयंसिधा

.तू मानिनी, स्वयंसिधा

1 min
14.4K


 अडखळणाऱ्या पावलांनी शोधू कसा नि कुठवर किनारा ?

सावरणेही तिच शिकवून गेली अडखळणाऱ्या पावलांना ...

उलटून रात गेली... आता उरली पहाटची प्रतीक्षा ... 

होते सावरले तूच गडे ! होती हरवलो वाट मी जेव्हा ...  

तुझं नि माझं हे कसलं नातं ? तू नाहीस जीवनात तरीही ..  

असायला हवी होतीस असंच वाटतं उगाचच ...

विसरू तुला पाहता - पुन्हा - पुन्हा आठवतेस 

मी तुझ्यात आणि तू माझ्यात गुंतलेली ...

प्रीत कशी हे जगावेगळी, ना तू बेईमान, ना मी होतो कधीही 

फरक फक्त इतकाच होता, तू मला अन मी तुला गृहीत धरलं 

माझ्याप्रती तुझं प्रेम तितकंच माझंही तुझ्या इतकंच समर्पीत 

सारं काही तर होत चारचौघांसारखं .. माझं गीत , तुझी प्रीत 

सॊडून गेलीस तू अर्ध्यावरती डाव मोडून तरी, खूप काही शिकवून गेलीस 

मोडून पडला संसार तरी कसं उभं राहावं, नियतीलाही कसं झुकवावं ...

सलाम ! तुझ्या जगण्याला आणि भोगण्याला.. खरंच सलाम !. 

म्हणून तर तू माझ्यासाठी प्रेरणादायी ...तू मानिनी, स्वयंसिधा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance