Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shreyas Gawde

Inspirational

2  

Shreyas Gawde

Inspirational

तू माझ्या ध्यानी-मनी

तू माझ्या ध्यानी-मनी

1 min
7.2K


तू रंग-रुपी सोज्वळ, तू साधी-सरळ

नाही तुला गोड खळी, नाही तू माझी प्रेयसी;

तरी कस्तुरी मृग्जळापरी भासे तू माझ्या ध्यानी-मनी|| धृ ||

तू द्रव्य-रूपी नीर, तू शांत-नितळ.

नाही तू मीरा, नाही कोणी मोहिनी;

सप्तसुर, लयताल  तार छेडिली तू माझ्या हृदयी स्वर-ताली|| १ ||

तू अंत-रूपी निरंतर, तू अथांग सागर

नाही तू मासोळी, नाही कोणी जलपरी;

तरी क्षितीजावरी घेतेस तू पुन्हा फिनिक्स ‘गगन-भरारी’|| २ ||

तू स्वप्न-रूपी जीवन, तू स्वप्नवत इंद्र दरबार

नाही तू अप्सरा, नाही तू कोणी परी;

तरी ‘स्वर्गापरी’ दाखवी तू मला माझी ‘स्वप्न-नगरी’| ३ ||

तू सखी-रुपी आस्वाद, तूचं मैत्री-रूपी माझा श्वास.

नाही तू राधिका, नाही कोणी मस्तानी;

तरी स्मितहास्यापरी गुंतवी तू समस्त प्रेमी-मंडळी || ४ ||

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational