तू होतीस तेव्हा
तू होतीस तेव्हा
दिवस ते मखमली सुंदर
जणू शिंपडले गुलाबी अत्तर
रोज दोन ओळी काव्याच्या
रात्रीच्या प्रकाशात काजव्याच्या
असायचा तुझ्या हातात हात
करायचो अडचणींवर मात
आवडचा तुझा तोरा नि नखरा
जेव्हा माळायची केसांत गजरा
तेव्हा पाऊसही लयीत पडायचा
आपल्याला खूप खूप भिजवायचा
तू होतीस प्रेम होते नि होते संगीत
तू नाहीस बेरंगी जीवन, नाही रंगीत
आठवते सोबतची प्रत्येक सायंकाळ
आता विरून गेले ते क्षण, भूतकाळ

