तू ही लढ
तू ही लढ
सावित्रीच्या लेकी
घेत नभी झेप
तू ही लढ दाव
स्वकर्तृत्व खूप
सर्व क्षेत्री भारी
वीर यशस्वीनी
विविध रूपात
खंबीर मर्दिनी
जगी स्वयंसिद्ध
गृहदक्ष धाक
नित्य देह ओढे
संसाराचे चाक
नारी हीच शक्ती
प्रेम माया स्रोत
आदर्श संस्कृती
ज्योत ओतप्रोत
उत्तुंग कर्तव्य
सुरेख चौकस
उभी दिपस्तंभ
यशस्वी कळस
ईश्वराची माया
घरी दारी वास
प्रगल्भ प्रभावी
तेजस्विनी खास
