STORYMIRROR

kusum chaudhary

Inspirational

3  

kusum chaudhary

Inspirational

तू ही लढ

तू ही लढ

1 min
176

शिक्षणाची कास

धरून तू ही लढ.

यशाचे शिखर

जीवनात चढ.


नवचंडी दुर्गा.

झाशीची तू राणी

सावित्री इंदिरा

दाखव होऊनी


 मशाल घेऊन

हाती घे भरारी.

घडव शिवाजी

 माय तू संस्कारी.


अन्यायाचा कर

नित्य प्रतिकार

रूढी झुगारून

स्वप्नांना साकार.


कर प्रतिकार.

अन्यायाविरुद्ध

स्वत:च हो ढाल

आता हो सिध्द.


कुणा न भिणारी.

नाहीच अबला.

तू ही लढ आता

होऊन सबला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational