STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Fantasy

3  

Abasaheb Mhaske

Fantasy

तू असतीस तर ...

तू असतीस तर ...

1 min
13.8K


तू असतीस तर ...

पांगले नसते पक्षांचे थवे

साकारले असते जग हे नवे


तू असतीस तर ...

पसरली नसती स्मशान शांतता

जीवघेणा एकांत उरला नसता


तू असतीस तर ...

करपून गेली नसती बाग

जगणे झाले नसते महाग


तू असतीस तर ...

झाली असती नवी पहाट

अन घरकुल आपुले प्रकाशमान


तू असतीस तर ...

पुन्हा वसंत फुलला असता

नवचेतना जागवली असती मना


तू असतीस तर ...

विकास अन् प्रगती

पुन्हा नव्याने शोधली असती


तू असतीस तर ....

नवसंजीवनी जीवना

पुन्हा नव्याने संचारली असती


तू असतीस तर ...

बहरले असते अंगण सारे

अन् प्राजक्ताची फुले



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy