तू आणि फक्त तू
तू आणि फक्त तू
तू माझ्या अंगणीची रातराणी
श्वासात दरवळणारा सुगंध तू
रूप दिसे सदा माझ्या लोचनी
नयनांनी पाहिलेले स्वप्न तू
नभातील शोभणारी चांदणी
तशी माझ्या जीवनी शोभे तू
साधा श्रृंगार तुझा ठसे मनी
मनाला मोडणारी मोहिनी तू
दुःखात सुखद तुझ्या आठवणी
सुन्या मैफिलीचे माझ्या सूर तू
वादळात नाव माझी दिशाहीन
पैलतीरी नेणारे प्रेम तू

