तू आहेस म्हणून
तू आहेस म्हणून
तू आहेस हसवायला म्हणून रडायला आवडते
तू आहेस मनवायला म्हणून रुसायला आवडते
तू आहेस ऐकायला म्हणून बोलायला आवडते
तू आहेस पाहायला म्हणून नटायला आवडते
तू आहेस सोबत म्हणून काटेरी वाटही फुलासम भासते
तुझा हात हाती म्हणून जगाची पर्वा नाही दिव्यासंग वाती....
तू असाच सोबत राहशील म्हणून जगायला आवडते

