तुला पाहता...
तुला पाहता...
शोधू कुठे तुला....
कुठे जाऊनी तू लपला....
आस पाहण्याची तुला ....
नको करू नाराज मला....
वसंत बहरून आलेला...
ही पंचमी आज तू कसा विसरला? .....
सखा, तुझ्याविना मजा नाही खेळायला...
वाट पाहूनी तुझी, नयना लागले रे थकायला...
हा गोकुळ सगळा रंगात रे रंगला.....
कधी का रंगली हि राधा तुझ्या विना?....
बहाणा पुरे झाला रे काना,कळे ना तुला?....
लावूनी रंग तिच्या गाला....
समोर उभा राहिला...
त्याच्या मोहक रुपालाही, राधेचा रंग चढला...
रंगाच्या खेळात प्रेमाचा रंग भरला....
आज राधास....
रंगात रंगुनी काना च्या
अवघा आनंद एक झाला...
रंगात रंगुनी कानाच्या
अवघा आनंद एक झाला...

