STORYMIRROR

Sanjana Kamat

Fantasy

3  

Sanjana Kamat

Fantasy

तुला पाहिले मी

तुला पाहिले मी

1 min
279

तुला पाहिले मी 

एक सुंदर फूल तू...


सौंदर्य पहावयास 

उजाडते पहाट ही 

हिऱ्याची खाण ही लाजली

पाहून भाळलो 

मी ही तुझ्यावरी

तुला पाहिले मी 

एक सुंदर फूल तू...


कित्येक जन्म घेऊन आलो तुझ्याचसाठी

युगानुयुगे मी फिरतोय तुझ्याचसाठी

म्हणून आलो काटा बनूनी या जन्मी

खूप भोली तू का जाणू न शकलीस

दुनिया रंगल्या गालाचे मुके घेणारी 

तुला पाहिले मी 

एक सुंदर फूल तू...


भोवऱ्या संगे गुलूगुलू बोललीस

त्या चंचल वाऱ्यास

तू का भुललीस ?

तूझ्यावर उठले जे हात

केले मी रक्तबंबाळ 

ओळखलेस ना माझेे तू मन

तुझ्याचसाठी काटा मी बनलो तुला पाहिले मी 

एक सुंदर फूल तू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy