तुला काय कळणार
तुला काय कळणार
वेड्या मनाची वेडी व्यथा
तूला काय कळणार
प्रेमात वेड लागणाऱ्यांची कथा
तूला काय कळणार || 0 ||
खूप दूर आहेस तू
प्रेमाच्या स्पर्शापासून
खूप दूर आहेस तू
प्रेमाच्या आदर्शापासून
प्रेमात उद्ध्वस्त होण्याची प्रथा
तूला काय कळणार
प्रेमात वेड लागणाऱ्यांची कथा
तूला काय कळणार || 1 ||