तुला जपताना
तुला जपताना
तुला जपताना हल्ली, दुःख जवळ पास येत नाही.
कदाचित त्यांना मला, देण्या इतका वेळच उरला नाही.
सगळ्यांनाच नाही जमत रे, तुझ्या सारख वागण,
ओठांवर जरी नसल, तरी मनात माझ्या तुझ असण.
मला नाही शांत राहायला जमत, तुझ्या सारख निर्विकार, निशब्द...
तु आणि तुझ्या आठवणी, यांच मनात नेहमी सुरु असत द्वंद्व..
मी होते निशब्द, स्तब्ध काय करावे सूचत नव्हतं.
मी स्वप्नात की सत्यात हेच कळत नव्हतं.
तू आला होतास, माझ्या ड़ोळयातले अश्रु पुसायला...
पण तुला कोण सांगनार, मी जिवंत असायला हवी ना
माझे अश्रु पुसायला.....