तुकडा
तुकडा
तुकड्याएवढ्याच जिंदगीचे
वेचतो उरलेले जीर्ण तुकडे
रुपडे पाहून दान इथे मिळे
कर्ण इथले स्वतःच नागडे
गरजेपुरते मागतो आणि
खळगा भरेल इतके खातो
साठवायला झोळीच फाटकी
मीही रोज जरा जरा फाटतो.
आभाळच बाप आणि माय
उरलेल्या दिवसांचा भरोसा नाय
वेचता वेचता तुकडेच अवघी
जिंदगी तुकड्याची विरघळून जाय.
