STORYMIRROR

Pandit Warade

Romance

4  

Pandit Warade

Romance

तुझ्या श्वासात आहे मी

तुझ्या श्वासात आहे मी

1 min
507

उभा अस्वस्थ होऊनी तिच्या दारात आहे मी।

मनाला भावले कळले तिच्या हृदयात आहे मी।।१।।


कधी काशी, गया, मथुरा, अयोध्या, गोकुळामध्ये।

कुठे मज शोधतो वेड्या तुझ्या श्वासात आहे मी।।२।।


कुण्या धुंदीत नाही मी जरी गुत्त्यावरुन आलो।

गुलाबी ओठ चुंबीले तया कैफात आहे मी।।३।।


पसरला गंध ज्वानीचा तिची गंधाळली काया।

सुगंधी मोगरा बनुनी तिच्या केसात आहे मी।।४।।


कशाला कापते मजला, कसाई का बनावे तू।

तुला अभिमान वाटावा तुझ्या उदरात आहे मी।।५।।


मला शक्ती, स्मृती, शांती, पुरवतो कोण तो दाता।

कृपा त्याची किती मजवर तयाशी ज्ञात आहे मी।।६।।


कशासाठी दुरावा हा, मनी झुरतेस का राणी।

नको जागूस रात्रीला, तुझ्या स्वप्नात आहे मी।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance