*तुझ्या प्रेमाची साथ*
*तुझ्या प्रेमाची साथ*
तु नेहमी च माझ्या सोबत उभा आहेस,
तुझ्या प्रेमाची साथ देखील आहे मला,
माझ्या प्रत्येक आवडी निवडी मध्ये,
तुझा मनापासून सहभाग असतो,
माझ्याआणि तुझ्या विचारा मध्ये,
खूप तफावत आहे, तरी देखील,
आपल्या नात्यातली वीन खुप घट्ट आहे,
हे मला पहिल्या पासून पटले आहे,
आपल नात भांडणातही प्रेम दर्शवीत,
जेथे प्रेम तेथेच भांडण असते,
पावसातल्या पहिल्या सरी मध्ये,.
जशी भिजावी,
अगदी तशीच मी तुझ्या प्रेमाच्या,.
ओल्या स्पर्शात भिजते,
शेकोटी जवळ बसुन,.
जी उब मिळते,
तीच उब मला तुझ्या,
प्रेमळ सहवासात जाणवते,
मी पाहिलेल्या स्वपनांना पुर्ण करण्यात,
तुझा खुप मोठा सहभाग आहे,
एकमेकांच्या सोबत ऊभे राहून,
एकमेकांना सुख दुखात साथ देऊन,
अडचणीत असताना हातात हात देऊन,
बिकट परिस्थिती वर मात करून,
संसाराचा गाडा यशस्वी करण्यासाठी
तुझा खूप खूप मोठा वाटा आहे,
आपण पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी,
तुझा सहभाग खुप खुप मोलाचा आहे,
आपण बांधलेले प्रेमाचे घरटे,
आज यात विश्व सामावले आहे,
फक्त आणि फक्त शेवट पर्यंत प्रेमाचा,
असाच सहवास असू दे...............
असाच सहवास असू दे.................

