तुझी आठवण येण्यासाठी आन आ लागत
तुझी आठवण येण्यासाठी आन आ लागत
तुझी आठवण यायला,
अजून काय लागते....
पहाटे पहाटे,शुक्रतारा,
चंद्रा सोबत चांदणी
सभोवताली मंद वारा
अनुभवते...
तुझी आठवण यायला
अजून काय लागते....
कोणी तरी बुलेट वरून,
सुसाट वेगाने जाते
कोणी तरी म्हणते
बुलेट चे भारीच वेड लोकांना
तुझी आठवण यायला
अजून काय लागते.....
पहाटे पहाटे अवचित
कुठून तरी पारिजातकाचा
सुगंध येतो
माझ्या रोमा रोमात
अनामिक तरंग उठऊन जातो,
तुझी आठवण यायला
अजून काय लागत.........
कुठेतरी रस्त्यावर जोडपं
गर्दीत रस्ता ओलांडते
तो हात मागतो आणि
हळूच ती हातात हात देते,
तुझी आठवण यायला
अजून काय लागत......
ब्युटी पार्लर मध्ये गेल्यास
माझ्या केसांना पाहून
कोणी म तरी म्हणत,
किती सुंदर सिल्की,
गोल्डन हेअर आहेत,
तुझी आठवण यायला
अजून काय लागत......
कधी कधी निवांत,
चहा घेत,
झोपाळ्यावर बसते
खट्याळ वारा
गालाला स्पर्शून जातो
तुझी आठवण यायला
अजून काय काय....
