*कविता म्हणजे काय*....?
*कविता म्हणजे काय*....?
हृदयातील कोंडलेल्या भावना
उफाळून शब्द रुपात अवतरते
ती कविता
अंतर्मनातील साद एकूण
भाव व्यक्त करते ती कविता
अबोल मनाला शब्दातून
बोलके करते ती कविता
कधी दुःखाचे भाव व्यक्त करते
आश्रु रोखते ती कविता
कधी सुखाच्या क्षणांना
प्रतिबिंबित करते ती कविता
भुरळ पाडणाऱ्या निसर्गाच्या.
सौंदर्याला शब्दात अलंकारीत
करते ती कविता
प्रेमाच्या हळव्या क्षणांची
शब्द जुळवनी म्हणजे कविता
अंतर्मनातील सुख दुःखाच्या
भावनेत ओथंबलेली असते कविता
शब्द शब्द मिळून लय,ताल आणि
यमक साधणारी ती कविता.
शब्दातून कधी अल्लड,
अवखळ,भाव व्यक्त होऊन.
बागडते ती कविता
शब्दातून कधी हसते,
कधी रडते,अंतर्मनातील भाव
शब्दात व्यक्त करते ती कविता.
कधी श्वासात बसते,
कधी डोळ्यात दिसते,
कधी स्वप्नात वसते ती कविता
कविता म्हणजे खळखळ
वाहणाऱ्या झऱ्याची मंजुळ साद
पहाटे किलबिल करणाऱ्या पक्ष्यांचा गलबलाट
झाडांमधून वाहणाऱ्या
वाऱ्याचा निनाद
सागराच्या उसळणाऱ्या बेभान
लाटांचा किनाऱ्याशी वाद.
