STORYMIRROR

Nirmala Shinde

Others

4  

Nirmala Shinde

Others

*शिवाजी महाराजांचा पोवाडा*

*शिवाजी महाराजांचा पोवाडा*

2 mins
683

प्रथम नमन करून गणेशाला

कुलस्वामिनी तुळजाभवानीला

कुलदैवत ज्योतिबाला

गुरु माऊलीला, संत महंताला


मुजरा करून,

क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत शिवाजी महाराजांना

त्यांचे गुणगान करायला

लिहिते पोवाड्याला

जी र जी र जी जी र जी जी......1


औरंगजेबाचा सख्खा मामा शाहिस्तेखान आला

पुण्यातील लालमहालात तळ ठोकला

स्वराज्य मुलखात धुमाकूळ घातला

स्वराज्याची राखरांगोळी करू लागला

दोन वर्षे झाले त्याने तळ ठोकला सर्व मुलुखाचा नासधूस करून उध्वस्त केला

शिवाजी महाराजांनी विडा उचलला 

ठरवले त्याची मस्ती जिरवण्याला

जी र जी जी र जी जी............ 2


योजना आखली त्याचा बंदोबस्त करण्याला

गनिमी कावा करणे हाच पर्याय योग्य वाटला

रमजानचा महिना सुरू झाला

धडा शिकवायचा ठरवले शाहिस्तेखानाला

मावळ्यांनी मोगली सैनिकांचा वेश परिधान केला

फसवले मोगलांच्या सैनाला, लाल महालात प्रवेश केला

जी र जी र जी जी र जी........3


शाहिस्तखान बेसावध झोपला

खबर नाही मोगली सैन्याला

खिंडार पाडले लाल महालाच्या भिंतीला

त्यातून लाल महालात प्रवेश केला ठार मारण्यासाठीशाहिस्तेखानाला

100 मावळे होते बाहेर तैनातीला

कांहीं मावळे शिवरायांच्या सोबतीला

 जी र जी जी र जी जी...........4


पहारेकरी जेऊन पेंगत होते त्या वेळेला

मार मार मारले मोगली सैन्याला

कळले एका नोकराला

गनिम आ गया गनिम आ गया असा धावा केला

एकच हाहाकार उडाला, 

जाग आली शाहिस्तेखानाच्या बेगमला

गनिमी अा गया गनिमी आ गया असा आरडाओरडा तिने केला

जी र जी जी र जी जी............5


शाहिस्तखानाचा जावई आणि मुलगा धावला

वाचविण्या शाहिस्तेखानाला

मावळ्यांनी मुंडके उडवले त्याच क्षणाला

जाग आली शाहिस्तेखानाला सैतान आला सैतान आला

असे म्हणून खिडकीतून पाळण्याचा प्रयत्न केला

त्याच वेळ शिवाजी महाराज धावले आणि छाटले त्याच्या बोटाला

जी जी र जी जी र जी जी..........6

 

अल्ला अल्ला म्हणत जीव मुठ्ठीत घेऊन पळाला

शिवाजी महाराजांनी पुन्हा गनिमी कावा केला

भागो भागों, शिवाजी को पकडो, असे म्हणत लाल महाल सोडला

सुखरूप आले मुक्कामाला

मावळ्यांनी मशाली बांधल्या बैलाच्या शिंगाला

फसवले मोगलांच्या फौजाना

तोपर्यंत महाराजांनी रायगड गाठला

जी जी र जी जी र जी............7


सुखरूप पोहांचले स्वराज्याला

 महाराजांनी पाणी पाजले शाहिस्तेखानाला

जरब बसवली शत्रू मोघलांना

विजयाची तोफ उडवली रायगडाला

मावळ्यांनी आनंद उत्सव साजरा केला

महाराष्ट्रातील लोकांनी शिवाजी महाराजांनचा जयजयकार केला

जी र जी जी र जी जी..............8



Rate this content
Log in