स्त्री दक्षता
स्त्री दक्षता
बाळा तूच आता तुझी काळजी घे
फुला तूच आता तुझी काळजी घे
किती लक्ष देईल माती तुझ्यासाठी
पाणी ही किती काळजी घेईल तुझी
काटे किती काळ जपतील तुला रे
माळी ही किती काळजी घेईल तुझी
फुला तूच आता तुझी काळजी घे..!!!
दिव्या तूच आता तुझी काळजी घे.
किती लक्ष देईल तेल तूप तुझ्यासाठी
किती काळजी घेईल वात ही तुझी
वारा येथे कधी वाहतो बेभान
कधी वाहतो येथे वादळ बनून
दिव्या तूच आता तुझी काळजी घे
बाळा तूच आता तुझी काळजी घे
किती काळजी घेईल आई तुझी ही
वडीलही किती जपातील तुला रे
बेभान मोकाट वारा सुटण्याच्या आत
उमलती कळी खुडण्याच्या आत
बाळा तूच आता तुझी काळजी घे...!!!
कधी हो तू दुर्गा कधी महाकाली
तुझी काळजी घे तू आता वेळोवेळी
नष्ट कर आता असुरी प्रवृत्ती
हाती घे शस्त्र, संपव दुष्ट वृत्ती
हाती घे त्रिशूळ, हो खड्गधारी
हो पुढे आता नको फिरू माघारी
बाळा तूच आता तुझी काळजी घे...!!!
