STORYMIRROR

Nirmala Shinde

Romance

3  

Nirmala Shinde

Romance

*प्रेम*.....

*प्रेम*.....

1 min
182

ज्याला आपण लाख प्रयत्न

करूनही विसरू शकत नाही,

ते प्रेम आहे..............


स्वतःला कितीही त्रास झाला तरी

त्याच्या साठी कांहीच वाटत नाही,

ते प्रेम आहे.................... 


सकाळी झोपेतून उठल्या बरोबर,

ज्याचा चेहरा समोर दिसतो,

ते प्रेम आहे..................,,..


खुप भांडणे झाली तरी,

ज्याचा राग येत नाही,

ते प्रेम आहे...................


मंदिरात दर्शन घेताना,

जो सोबत असावा असे वाटते,

ते प्रेम आहे.....................


ज्याच्या कुशीत डोक ठेवल्यावर,

दिवसभराचा थकवा कमी होते,

ते प्रेम आहे..............


ज्याच्या जवळ मन मोकळे 

करावे वाटते, मन हलके होते

ते प्रेम आहे...................


ज्याचा सहवास हवाहवासा वाटतो

ज्याच्या सोबत फोटो काढावे वाटते

ते प्रेम आहे...............


बाहेर कोठेही जा, जो सतत, 

सोबत असल्याचा, आसपास असल्याचा भास होतो,

ते प्रेम आहे.......... .....

 

ज्याचा छोटया छोटया 

गोष्टी वरून राग येतो,.

पण त्याच्या शिवाय करमत नाही

ते प्रेम आहे..............


ज्याच्या सोबत चंद्र प्रकाशात, 

कोजागिरी पौर्णिमा दिवशी,

गरबा नृत्य करावे वाटते,

ते प्रेम आहे................


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance