होळी
होळी
तुझ्या प्रेमाच्या रंगात रंगले अलवारपणे
दवबिंदू जसे हिरव्या पानावर
भ्रमित भ्रमर जसा कमळाच्या फुलात
चांदणी जशी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रेमात
जशी रंगीली राधा सावळ्या कृष्णाच्या प्रेमात
संत मीरा कृष्ण मुरारीच्या भक्ती रंगात
प्रेमाची पिचकारी, मनाचा गुलाबी रंग
आपण दोघे खेळू प्रेमाचा रासरंग
करून हिंदू रुढी परंपराचा स्विकार
उधळू अबीर गुलाल, घालू नऊ रंगाचा अलंकार...
होळी आणि रंग पंचमीच्या शुभेच्छा!!!

