तुझ्या नजरेतुन
तुझ्या नजरेतुन
हिरव्या पानातुन झिरपणारे कोवळे ऊन,
श्वासांचे उंच मनोरे आल्हादाने चढवुन ,
पहाडांचे अप्रतिम सौदर्यं टिपतांना बघा,
माझ्या डोळ्यांवर चढणारे या सृष्टीचे ऋण ,
तरीही चक्रवाढीप्रमाणे वाढतच चालले ,
मी थांबवु शकत नाही या वेड्या डोळ्यांना ,
जे पुन्हा पुन्हा पाहु बघतात तुझ्या डोक्यांवरचा,
हळुच पदर बाजुला सारून तुझ्या त्या ,
अलौकिक सौदर्यांला ...
तुझ्या त्या चेहऱ्यावरच्या चांदीला ,
ओंजळीत घेऊन उधळुन बघते मी चौफेर ,
मनसोक्त आनंद तुझ्या कुशीतला अनुभवायचा ,
या तुझ्या वाऱ्यांशी मला संगनमत करून ,
माझ्या पंखात त्यांना बांधुन ,
उंच उंच उडायचे आहे मला ,
श्वासांचे उंच मनोरे आल्हादाने चढवुन ,
हिरव्या पानातुन झिरपणारे कोवळे ऊन,
पांघरायचे आहे मला माझ्या कांतीला उजळवून ,
निघेल मी तुझ्या सानिध्यातुन ...
कायमचे माझ्या डोळ्यात साठवुन ...
तुझ्या नजरेतुन माझे आयुष्य पाहतांना,
कानी गुंजते माझ्या निर्झर वाहणाऱ्या व्यास नदीचा सुर,
जणु सोबत आहे ती माझ्या लिहीतांना ,
तु वाहवत जा माझ्या पाण्यात ,
मी आहे सोबती तुला त्या समुद्रात मिळतांना ,
जेव्हा थोडीशी पटते मी स्वतःला ,
त्या नदीत स्वतःला डोकावतांना ,
कायमचे माझ्या डोळ्यात साठवुन ,
त्या पाहाडांच्या धारदार टोकांनी चिरत जाणाऱ्या धुक्यांना,
कुरवाळत धिर देईल मी ...
श्वासांचे उंच मनोरे आल्हादाने चढवुन ,
हिरव्या पानातुन झिरपणारे कोवळे ऊन,
कायमचे माझ्या डोळ्यात साठवुन ...
