STORYMIRROR

Supriya Devkar

Romance

3  

Supriya Devkar

Romance

तुझ्या मिठीत

तुझ्या मिठीत

1 min
626

तुझ्या मिठीत हरवून जावे

विसरून जावे सारे जग

तुझ्या स्पर्शाने मिटावे ताप

विरून जावी सारी धग

बघ माझ्या डोळ्यात खोलवर

तुझ्या प्रेमाची अधीर पाखरे

तुझाच लळा त्यांना अन

तुझाच त्यावर धाक रे

अशीच असावी घट्ट मिठी 

आणखी वेगळे काय मागणे

तुझ्या सहवासाची ओढ मला

सवयीचे तुझे उनाड वागणे

प्रेमाचा हा खेळ आगळा

नकोच त्याला कसली भाषा 

निस्सीम या देण्याला

नकोच अनाठायी आशा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance