तुझ्या मिठीला सवड...!
तुझ्या मिठीला सवड...!
जगाला विसरतं बरसावं
तू माझ्यात नि मी तुझ्यात
एक एक करत उघडावी कवाडे
अधीर स्पर्शाच्या दवात...!
श्वासात मिसळावे श्वास माझ्या
अलगद ओढावेस मिठीत तुझ्या
सैलसर करावेस ओझ्यातून त्या
स्व:तास पांघरावे देहावर या....!!
भानावर येतां मी
स्वर्गही वाटावा रीता मला
रागाच्या वेळा अवघड
फक्त तुझ्या मिठीला सवड...!!!

