आधारातला संघर्ष
आधारातला संघर्ष
विचारांना मिळाला आधार
जेव्हा तुला सभेत बोलताना ऐकले,
भविष्याला मिळाला आधार
जेव्हा तुला घट्ट हातात हात
गुंफतांना पाहिले.....!
पण तू ही माणुसचं.....
किती करणार संघर्ष
त्याला ही मर्यादा असल्याचे तू ही
लहाणपणापासून असशीलच की ऐकले
संयम सुटल्याच्या कथा पुराणातील तू ही
टिव्हीवर असशीलच की पाहीले. ....!
म्हणून तुझा आधार, तुझा संघर्ष
मला पोकळ वाटत नाही
तरीही,
तुझ्याबद्दल मनात पुर्वग्रह ठेवून
तुझे शब्दरूपी भावंनांना नाही ऐकले
ना तुझ्यासंवेदनशील कृतीकडे
उदासीनवृत्तीने कधी पाहीले.....!
